17 September 11:05

‘एप्रिल ते जून’ दरम्यान कांदा निर्यातीत १४ टक्के घट


‘एप्रिल ते जून’ दरम्यान कांदा निर्यातीत १४ टक्के घट

कृषिकिंग, नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत कांदा निर्यातीत १४ टक्क्यांनी घट होऊन ती ९.४५ लाख टन नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत १०.९८ लाख टन नोंदवली गेली होती.

राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास महामंडळाच्या (एनएचआरडीएफ) आकडेवारीनुसार, “यावर्षी निर्यातीद्वारे कांद्याला प्रति टन ११,६२१.२७ रुपये एवढा दर मिळाला आहे. त्यामुळे यावर्षीच्या २०१७-१८ च्या एप्रिल ते जून दरम्यान ९.४५ लाख टन म्हणजेच १०९८.५८ कोटी रुपयांची कांदा निर्यात झाली आहे.”टॅग्स