27 October 08:30

‘आरा १५’ आणि ‘लनिया १’ नवीन द्राक्ष वाणांचे पहिल्यांदाच भारतात उत्पादन


‘आरा १५’ आणि ‘लनिया १’ नवीन द्राक्ष वाणांचे पहिल्यांदाच भारतात उत्पादन

कृषिकिंग, नाशिक: “चिली या देशातील ‘लनिया १’ आणि कॅलिफोर्निया या देशातील ‘आरा १५’ या नवीन द्राक्ष वाणांचे पहिल्यांदाच भारतात उत्पादन घेतले जात असून, ती यावर्षी बाजारात येणार आहे,” अशी माहिती नाशिकमधील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी दिली आहे.

“जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्ष हंगाम सुरु होण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात ४० एकरच्या परिसरात या प्रजातींच्या द्राक्षांचे पीक घेतले जात आहे. या दोन्ही द्राक्ष प्रजाती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुप्रसिद्ध आहेत. आणि त्या प्रथमच देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत.” असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

या वर्षी निवडक कृषी बियाणे आणि रोपवाटिका पुरवठादारांकडे या प्रजाती उपलब्ध आहेत. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत दोन हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर या प्रजातींचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे.टॅग्स