03 April 16:40

४ व ५ एप्रिलला राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता- आयएमडी


४ व ५ एप्रिलला राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील शेतकरी गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या संकटातून जरा कुठे सावरतो. तोच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग दाटून आल्याचे दिसून येत आहे. उद्या म्हणजेच ४ आणि ५ एप्रिलला महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज मुंबई येथील हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.

संपूर्ण दक्षिण भारतात छत्तीसगड ते कर्नाटक दरम्यान वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच कोकणच्या काही भागात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तरी काढणी केलेल्या आणि साठवलेल्या पिकांचे संरक्षण करावे. तसेच उन्हाळी पिकांच्या संरक्षणासाठी व्यवस्था करावी. असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

विदर्भात पारा ४२ डिग्री वर गेल्याने उन्हाची काहिली वाढली आहे. त्यातच आता दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, असे असले तरी तापमानात कुठलीही घट होणार नाही. असेही हवामान खात्याने म्हटले आहे.