28 March 10:41

२८ ते ३० मार्च दरम्यान राज्यात पावसाची शक्यता- आयएमडी


२८ ते ३० मार्च दरम्यान राज्यात पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: राज्यात २८ ते ३० मार्च याकालावधीत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असून, विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात वाढ दिसून आली आहे. तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पारा चाळिशी पार पोहोचला आहे. बुधवारी अमरावती येथे राज्यातील सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

तर बुधवारी विदर्भातील अमरावती, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम या, तर मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत तापमान ४० अंशांवर राहिले. या परिस्थितीत मध्य महाराष्ट्र व आसपासच्या परिसरात चक्रवात स्थिती निर्माण झाल्याने २८ ते ३० मार्च याकालावधीत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.



टॅग्स