28 June 17:51

२४ तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता


२४ तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: मुंबईत बुधवारीदेखील पावसाचा जोर कायम असताना येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. संततधार पावसामुळे मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकलची वाहतूक मंदावली आहे. तर गुरुवारी कोकण-गोवा-केरळसह विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, तसेच मुंबईत मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे हवामान खात्याने सांगितले आहे.

तसेच, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ ते ७२ तासांत मॉन्सून संपूर्ण उत्तर-मध्य भारताला सामावून घेणार आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या मान्सून पुन्हा वेग घेतला आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ दिवसांत मॉन्सून दिल्ली, हरियाणा, यूपी, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशच्या जवळपास सर्वच भागांत पोहचेल. असे असले तरी राज्यांमध्ये मॉन्सून पूर्व पावसाने गेल्या काही दिवसांपासून चांगलीच हजेरी लावली आहे.

दुसरीकडे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, रायलसीमा आणि तामिळनाडू या भागांमध्ये मॉन्सूनचा पाऊस कमी होणार आहे. तर पूर्वोत्तर राज्यांमध्ये मॉन्सूनच्या हलक्या पावसाची शक्यता आहे.