22 October 15:24

२०१७-१८ मध्ये भारतातून २,१४,४४० मेट्रिक टन द्राक्ष निर्यात- वाणिज्य मंत्रालय


२०१७-१८ मध्ये भारतातून २,१४,४४० मेट्रिक टन द्राक्ष निर्यात- वाणिज्य मंत्रालय

कृषिकिंग, नवी दिल्ली: "२०१७-१८ मध्ये भारतातून २,१४,४४० मेट्रिक टन इतकी द्राक्षे निर्यात करण्यात आली आहे. या एकूण निर्यातीत नेदरलँड, रशिया, यूके, जर्मनी आणि संयुक्त अरब अमीरात या देशांना सर्वाधिक निर्यात करण्यात आली आहे." अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, २०१७-१८ मध्ये आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये द्राक्षाचे दर कोसळले होते. मात्र, तरीही द्राक्ष निर्यातीत कोणताही अडथळा जाणवला नाही.टॅग्स