09 October 11:05

१३ ऑक्‍टोबरला राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार?


१३ ऑक्‍टोबरला राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

कृषिकिंग, मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याची चर्चा असून, येत्या शनिवारी म्हणजेच १३ ऑक्‍टोबरला राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्य मंत्रिमंडळात सध्या २५ कॅबिनेट आणि १६ राज्यमंत्री आहेत. त्यात शिवसेनेच्या पाच कॅबिनेट, तर सात राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा अजूनही भरायची आहे. भाजपच्याही तीन जागा भरायच्या आहेत. राज्यातील फडणवीस सरकारची मुदत आणखी एक वर्ष आहे. त्याआधी मार्च-एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकाही अपेक्षित आहेत. अशावेळी मंत्रिमंडळाचा हा संभाव्य विस्तार व फेरबदल अखेरचा ठरण्याची शक्‍यता आहे. रविवारी मुख्यमंत्री राजधानी दिल्लीत गेले होते. तेथे त्यांनी पक्षाच्या काही नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते आहे.