12 December 10:43

१२ डिसेंबर- लोकनेत्याचा वाढदिवस


१२ डिसेंबर- लोकनेत्याचा वाढदिवस

कृषिकिंग, पुणे: आज राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ आपला ठसा उमटवलेल्या लोकनेत्याचा, अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा आज ७८ वा वाढदिवस.

जन्म- १२ डिसेंबर १९४० काटेवाडी (बारामती).

महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री (वयाच्या ३७ व्या वर्षी), ४ वेळेस मुख्यमंत्री, ७ वेळेस आमदार, ७ वेळेस खासदार, १० वर्षे केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, बीसीसीआय-आयसीसी अध्यक्ष, देशातील जवळपास सगळ्या मोठ्या घटनांमध्ये सहभाग असणारे, एक सामान्य कार्यकर्ता ते असामान्य नेता. गेली ५० वर्षे महाराष्ट्राच्या आणि २५ वर्षे भारतीय लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या, मागील पाच दशकात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाचा आरसा असणाऱ्या शरद पवार यांना ७८ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

खेडेगावातल्या एखाद्या कार्यकर्त्यापासून साहित्य, संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत आणि स्वपक्षापासून विरोधी पक्षांपर्यंत पवारांच्या मैत्रीचे वर्तुळ विस्तारलेले आहे. एखाद्या माणसाचे पैलू एवढे असू शकतात? हे उल्लेखनीय आहे. आणि विशेष म्हणजे वयाच्या ७८ व्या वर्षीही त्यांच्यातील ऊर्जा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावी अशीच आहे. सध्या अधिवेशन सुरु असल्याने शरद पवार कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेत सहभागी होत नेतृत्व करत आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी देखील शरद पवार हे राजकारणात प्रचंड सक्रीय असून, त्यांचा काम करण्याचा उत्साह आजही अनेक तरुणांना लाजवेल असाच आहे.

देशाच्या राजकारणावर छाप पाडणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी शरद पवारांची गणना केली जाते. शेती, क्रीडा, साहित्य, विज्ञान अशा सर्वंच क्षेत्रात पवारांनी आपला ठसा उमटवला आहे. राजकारण, समाजकारणात रमणारे पवार हे क्रिकेटमध्येही तितकेच रमतात हे आजवर अनेकदा पाहायला मिळाले आहे.

त्यांना २०१७ मध्ये भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषीमंत्री, संसदेतले विरोधी पक्षनेतेपद आणि याचसोबत असंख्य पदे त्यांनी भुषवणली आहेत.टॅग्स