28 November 17:49

१२ गोण्या कांदा विकला; शेतकऱ्याला मिळाले अवघे ५० रुपये


१२ गोण्या कांदा विकला; शेतकऱ्याला मिळाले अवघे ५० रुपये

कृषिकिंग, अहमदनगर: संगमेनरच्या बाजार समितीत १२ गोणी कांदा (६५३ किलो) विक्रीस आणलेल्या एका शेतकऱ्याला वाहतूक, गोणी, तोलाई, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा करता अवघे ५० रूपये मिळाले आहे. ऐन दुष्काळात मोठ्या कष्टातून पिकवलेल्या कांद्याला असा कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

संगमनेरच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील चंद्रकांत लाडुजी घुले नियमित कांदा उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. त्यांनी १२ गोण्या कांदा संगमनेर बाजार समितीत विक्रीस आणला होता. मात्र, त्यांना ६५३ किलो कांदा विक्रीतून वाहतूक, गोणी, तोलाई, हमाली, वाराई असा सर्व खर्च वजा होता अवघे ५० रुपये मिळाले आहे. त्यांच्या या कांद्याची प्रति किलो १ व २ रुपये दराने खरेदी करण्यात आली. खर्च वजा जाता त्यांच्या हाती अवघे ५० रुपये पडले.

यावर्षी राज्यभर दुष्काळाचे सावट आहे. कांदाच भविष्यात थोडाफार आर्थिक आधार देईल, अशी अपेक्षा ठेऊन शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले. मात्र, नंतरच्या पाऊस न झाल्याने हा कांदा पाण्याअभावी काही ठिकाणी जळून गेला. तर काही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जगवलेल्या कांद्यालाही आता अपेक्षित भाव मिळत नाहीये.



टॅग्स