11 May 10:37

११ ते १४ मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता- आयएमडी


११ ते १४ मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: “११ ते १४ मे या काळात संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, या काळात विदर्भ-मराठवाड्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते. तसेच या काळात संपूर्ण राज्यात सोसाट्याचा वाराही पाहायला मिळू शकतो,” असा अंदाज पुणे येथील भारतीय हवामानशास्र विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, काल (गुरुवारी) दुपारी मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. मराठवाडा व राज्याच्या उर्वरित भागातही कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित वाढलेले पाहायला मिळाले. एकीकडे हा उन्हाचा पारा वाढत असतानाच सातारा, सांगलीसह कोकणात काल पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यात वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सांगलीत तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारांचा वर्षावही पाहायला मिळाला. मात्र, या पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर तिकडे गोव्यासह कोकणातही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने कोकणातील काजू, आंबा यासारख्या उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे.टॅग्स