20 February 12:52

हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने पंचसूत्रीचा अवलंब करावा


हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने पंचसूत्रीचा अवलंब करावा

कृषिकिंग, नवी दिल्ली: हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम दिसून येतो आहे. गेल्या आठवड्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदर करताना खुद्द केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नमूद केले आहे की, हवामान बदलामुळे देशातील कृषी क्षेत्रातील उत्पन्नात २५ ते ३० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट सध्या करायचे करण्यासाठी हवामान बदल हा कृषी क्षेत्रासमोरील सर्वात मोठा अडथळा आहे. कारण यामध्ये हवामानविषयक घटना (गारपीट, अतिवृष्टी, वादळ, महापूर आणि अन्य प्रकारे), तापमानवाढ आणि कमी पर्जन्यमान यांचा भारतीय शेती उत्पादनावर मोठा परिणाम होतो. त्याअनुषंगाने सरकारने देशातील शेतकऱ्यांना पुढील पाच मार्गांनी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. यामध्ये आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध करणे, कापणीनंतर होणारे नुकसान टाळण्यास मदत करणे, मध्यस्थरहित बाजारपेठ उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन पीक विमा उपलब्ध करून देणे, प्रत्यक्ष कृती आधारित कृषी संशोधनावर भर देणे गरजेचे आहे.