05 March 07:00

हळद सल्ला: ट्रॅक्टरचलीत काढणी यंत्रामुळे होणारे फायदे आणि हळदीची विभागणी


हळद सल्ला: ट्रॅक्टरचलीत काढणी यंत्रामुळे होणारे फायदे आणि हळदीची विभागणी

स्त्रोत: कृषिकिंग द्वैमासिक फेब्रुवारी-मार्च २०१८

ट्रॅक्टरचलीत हळद काढणी यंत्रामुळे होणारे फायदे-
१. एका दिवसात ०.८ ते १.२ हेक्टर क्षेत्रावरील हळद काढणी करता येते.
२. जमिनीत हळकुंडे राहण्याचे प्रमाण कमी होते. हळकुंडाची नासाडी फक्त ४ ते ५ % होते.
३. कंदास चिकटलेले मातीचे प्रमाण कमी असल्यामुळे मजुरीचा खर्च कमी होतो.

• काढलेल्या कंदाची जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे आणि सोरा गड्डे अशा प्रकारे विभागणी करावी.
• बियाण्यासाठी ठेवण्याची हळद सावलीमध्ये साठवावी त्यासाठी जेठा गड्डा किंवा मातृकंद ५० ग्रॅमपेक्षा जास्त, त्रिकोणाकृती, आकाराने मोठा आणि दणकट असावा. बगल गड्डे किंवा अंगठे गड्डे ४० ग्रॅमपेक्षा जास्त तर हळकुंडे ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावी.
• चालू वर्षी लागवडीसाठी वापरलेले बियाणे पुढील वर्षी काढणी केल्यानंतर त्यांना सोरा गड्डे म्हणतात. त्यांना दर जास्त मिळतो. हा गड्डा मुळ्याविरहित असून जेठा गड्ड्याच्या बाजूलाच असतो.
टीप- कोणत्याही परिस्थितीत हळदीचा पाला कालावधी पूर्ण झाल्याशिवाय काढू नये अन्यथा उतारा कमी पडतो आणि हळकुंडावर सुरकुत्या पडतात.

डॉ. जितेंद्र कदम, काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था, रोहा.

कृषिकिंग द्वैमासिक नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक 18002708070
http://www.krushiking.com/advdetails.php?table=tbloffers_new&id=82