14 November 12:30

हंगाम सुरु होण्यापूर्वीच द्राक्षांची आवक सुरु


हंगाम सुरु होण्यापूर्वीच द्राक्षांची आवक सुरु

कृषिकिंग, पुणे: द्राक्ष हंगाम सुरू व्हायला अद्याप महिनाभर वेळ आहे. डिसेंबरमध्ये द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. मात्र, यावर्षीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी महिन्याभर आधी मार्केट यार्डातील घाऊक फळ बाजारात द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत घाऊक बाजारात अडीच टन द्राक्षांची आवक झाली आहे. याशिवाय गेल्या दोन दिवसांत इंदापूर, बारामती भागातून द्राक्षांची आवक सुरू झाली आहे.

सध्या आवक तुरळक असली तरी येत्या काही दिवसांत आवक आणखी वाढेल. शरद सीडलेस (काळी द्राक्षे) या जातीच्या चार किलो द्राक्षांना प्रतवारीनुसार चारशे ते पाचशे रुपये तसेच तासेगणेश (पिवळसर द्राक्षे) या जातीच्या आठ किलो द्राक्षांना प्रतवारीनुसार आठशे ते एक हजार रुपये भाव मिळाला आहे, अशी माहिती फळ बाजारातील एका व्यापाऱ्याने दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत घाऊक बाजारात द्राक्षांना वीस ते तीस टक्के जादा भाव मिळाला आहे.टॅग्स