04 April 11:04

स्कायमेटने यावर्षी कमी पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी आपटी


स्कायमेटने यावर्षी कमी पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी आपटी

कृषिकिंग, मुंबई: मुंबई शेअर बाजारातील विक्रमी पातळीवरील व्यवहारांच्या दरम्यान, काल (बुधवारी) हवामानविषयक अंदाज वर्तविणारी खासगी संस्था असणाऱ्या 'स्कायमेट'ने आपला अहवाल सादर केला. आपल्या अंदाजात स्कायमेटकडून यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने त्याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर झाला. यामुळे गुंतवणूकदारांनी समभागविक्रीचा सपाटा लावला आहे.

त्यामुळे तीन दिवस तेजी अनुभवल्यानंतर शेअर बाजारांत घसरण नोंदविण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) मंगळवारच्या विक्रमी पातळीवरून २४९ अंकांनी घसरून आज ३८,८०८ च्या पातळीवर (सकाळी ११ वाजताची स्थिती) स्थिरावला आहे. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ८५ अंकांच्या घसरणीने ११,६२७ च्या पातळीवर (सकाळी ११ वाजताची स्थिती) स्थिरावला आहे.