13 November 09:05

सोयाबीन गरम असल्यामुळे जनावरांना खाद्य घालावे का?


सोयाबीन गरम असल्यामुळे जनावरांना खाद्य घालावे का?

सोयाबीन हे गरम असल्यामुळे ते खाद्य घातल्यास गाई/ म्हशी/ शेळ्या गाभटतात हे खरे आहे काय?
हा मोठा गैरसमज आहे. सोयाबीन गरम म्हणजे अतिशय पौष्टिक आहे कारण त्यात प्रथिने व चरबी (तेल) भरपूरआहे. कोणताही पौष्टीक पदार्थ प्रमाणाबाहेर दिला तर तो पचत नाही. न पचल्यामुळे त्यातून काही प्रकारची तीव्र रसायने तयार होवून ती गर्भाशयाला मारक ठरतात. तसेच सोयाबीनवर प्रक्रिया करून ते खावयास दिले तर अजिबात धोका नाही. कच्चे सोयाबीन धोकादायक आहे.
लेखक- डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०