27 December 15:01

सातवा वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; १ जानेवारीपासून लागू


सातवा वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; १ जानेवारीपासून लागू

कृषिकिंग, मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारने नववर्ष भेट दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता १ जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असून, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात के.पी.बक्षी आयोग समितीने एक अहवाल तयार केला होता. बक्षी समितीच्या या अहवालावर आज मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रति महिना ५ हजारापासून १४ हजार रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी मिळणाऱ्या जानेवारी महिन्याच्या पगारात ही वेतनवाढ मिळेल. याशिवाय १ जानेवारी २०१६ पासूनची तीन वर्षांची थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा केली जाणार आहे.

या सातव्या वेतन आयोगाचा राज्यातील १७ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि ७ लाखांपेक्षा जास्त पेन्शन धारकांना लाभ होणार आहे. तर यामुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी जवळपास २१ हजार ५३० कोटींचा बोजा पडणार आहे.