16 April 15:12

साखर उद्योगावर पुढील वर्षी मोठे संकट- शरद पवार


साखर उद्योगावर पुढील वर्षी मोठे संकट- शरद पवार

कृषिकिंग, बारामती: प्रत्येक क्षेत्रात संकटे ही येत असतात. मात्र, साखर उद्योगासमोर पुढील वर्षी मोठे संकट उभे राहणार आहे. यावर्षी प्रचंड ऊस उत्पादन झाले आहे. मात्र, जागतिक बाजारपेठ मंदावली आहे. त्यामुळे सध्यस्थिती पाहता पुढील वर्षी साखरेला २५०० रुपयांपर्यंतच दर मिळणार असल्याचे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले आहे.

बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पवार कृषी आणि शिक्षण पुरस्काराचे वितरण शरद पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी शरद पवार यांनी साखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे असल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे पुढील वर्षी केंद्र सरकारने ठरवून दिलेला ऊसाचा दर देणेही कारखान्यांना शक्य होणार नाही. जगातल्या साखर उत्पादक देशांनी प्रमाणापेक्षा जास्त साखर उत्पादित केल्यामुळे जागतिक बाजारपेठ मंदावली आहे. त्याचा परिणाम भारतातील साखर उद्योगाला भोगावा लागत आहे. पूर्वी आयात करणारा देश म्हणून भारताची ओळख होती. मात्र, शेतकरी आणि संशोधकांच्या जोरावर आपला देश निर्यात करणारा बनला आहे. अशा परिस्थितीत राज्यकर्त्यांनी शेती अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष देण्याची गरज आहे. असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले आहे.



टॅग्स