23 April 10:26

साखर उत्पादनासंदर्भात आज शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक होणार


साखर उत्पादनासंदर्भात आज शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक होणार

कृषिकिंग, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. विक्रमी साखर उत्पादनासंदर्भात दोघांमध्ये बैठक होणार आहे. स्वतः शरद पवार यांनी कोल्हापुरात बोलताना ही माहिती दिली आहे.

साखर उत्पादनसंदर्भात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागेच पत्र पाठवले होते. यंदा देशात साखरेचे गरजेपेक्षा अधिक उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखर परदेशात निर्यात करणे गरजेचे असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. शिवाय, ६० टक्के साखरेवर सेस लावून, रक्कम उत्पादकांना द्यावी. तसेच साखरेच्या वाहतूक खर्चासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणीदेखील पवार यांनी या पत्रात केली आहे. याच संदर्भात ते आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे.