17 January 11:27

सांगली जिल्ह्यातून यावर्षी २० हजार टन द्राक्ष निर्यात होणार


सांगली जिल्ह्यातून यावर्षी २० हजार टन द्राक्ष निर्यात होणार

कृषिकिंग, सांगली: सांगली जिल्ह्यातून यावर्षी युरोपियन आणि आखाती देशांत २० हजार टन द्राक्ष निर्यात होणार आहे. २ हजार १९१ शेतकऱ्यांनी ११४७ हेक्‍टर द्राक्षांची नोंदणी केली आहे. निर्यातीसाठी नोंदवलेल्या कंपन्यांनी या शेतकऱ्यांकडून द्राक्ष खरेदी सुरू केली आहे. जानेवारी अखेरपासून निर्यात आणि देशांतर्गत बाजारात द्राक्ष मोठ्या प्रमाणावर दाखल होणार आहेत.

गेल्या पंधरवड्यापासून आखाती देशांत जिल्ह्यातून निर्यातीला सुरवात झाली आहे. आतापर्यंत ६०० टनांहून अधिक निर्यात झाली आहे. सध्या आखाती देशांत यावर्षी काळ्या शरद सीडलेस द्राक्ष पेटीला सर्वाधिक ६००, तर पांढऱ्या द्राक्षाला ४०० रुपये दर मिळतोय. येत्या काळात हेच दर स्थिर राहण्याची शक्‍यता निर्यातदार शेतकरी व कंपन्यांकडून व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना थंडीचा फटका बसल्याने यावर्षी सांगलीची द्राक्षे भाव खात आहेत.टॅग्स