01 October 15:15

सलग पाचव्या वर्षी हवामान खात्याचा अंदाज चुकला


सलग पाचव्या वर्षी हवामान खात्याचा अंदाज चुकला

कृषिकिंग, पुणे: यावर्षी जून ते सप्टेंबर या काळात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे देशाच्या काही जिल्ह्यांवर यावर्षी दुष्काळाचे सावट जाणवण्याची शक्यता आहे. प्रमुख्याने गुजरात, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पर्जन्यमान चिंताजनक स्थितीत असून, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर वरुणराजाची अवकृपा झाल्याचे आकेडवारीतून समोर आले आहे.

हवामान खात्याने यावर्षी मान्सूनच्या काळात साधारणपणे ९७ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. पण प्रत्यक्षात सप्टेंबर अखेरीस केवळ ९१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सलग पाचव्या वर्षी हवामान खात्याचा अंदाज चुकला आहे.