29 June 15:08

समृद्धी महामार्ग लांबणीवर पडण्याची शक्यता


समृद्धी महामार्ग लांबणीवर पडण्याची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांशी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भूसंपादन आणि कर्जमाफीमुळे सरकार समृद्धी महामार्गाचे काम एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा विचार करत असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यापासून समृद्धी महामार्गाचे काम सुरु होणर होते. मात्र, भूसंपादनाला शेतकऱ्यांच्या विरोध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोषापुढे कर्जमाफी फिकी पडू नये. याचीही चिंता सरकारला आहे. तसेच, शेतकरी कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटी रुपये लागणार असल्याने ४६ हजार कोटींच्या समृद्धी महामार्गावर लगेच खर्च करू नये, असे ठरविले जात आहे.

मात्र असे असले तरी सरकार इतर विकास कामांना कात्री न लावता सर्व कामे वेळेवर पूर्ण केले जातील. कर्जमाफी दिल्याने शेतकरी आनंदी आहे. मात्र शहरातील विकास कामे बंद केली तर शहरी मतदार नाराज होईल. त्यामुळे नागपूर, पुणे, मुंबई येथील मेट्रो कामे नियमितपणे सुरु राहतील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.