01 June 08:30

समाधानकारक मॉन्सूनच्या अंदाजाने सोयाबीनच्या दरात घसरण


समाधानकारक मॉन्सूनच्या अंदाजाने सोयाबीनच्या दरात घसरण

कृषिकिंग, पुणे: यावर्षी मॉन्सूनचा पाऊस समाधानकारक होणार असल्याने सोयाबीन दरात घसरण पाहायला मिळत आहे. घाऊक बाजारात सोयाबीनचा दर मागील एक महिन्याच्या निच्चांकी पातळीवर पोहचला आहे. तर वायदा बाजारात सोयाबीनचा दर एका वर्षाच्या निच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. दरम्यान, मागणीतील घट आणि लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याने येत्या काळात सोयाबीनच्या दरात अजूनच घसरण पाहायला मिळू शकते.

सध्यस्थितीत सोयाबीनचा दर ३६०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आले आहेत. घाऊक बाजारात सोयाबीनचा दर ३७०० रुपये प्रति क्विंटलवरून ३६०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरला आहे. तर वायदा बाजारातही सोयाबीनचा दरात ३५९५ रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे.

यावर्षी मॉन्सून हा समाधानकारक होणार असल्याने अनेक कृषी उत्पादनांच्या किमतींवर त्याचा परिणाम पाहायला मिळतो आहे. खरीपातील सर्वच कृषी उत्पादनांच्या दरात सध्या घसरण मिळते आहे. सोयाबीनचे व्यापारी मिथिलेश यांनी सांगितले आहे की, “मागील एक महिन्यापासून सोयाबीनच्या मागणीत घट झाली असून, निर्यातही मंदावली आहे. आणि हेच कारण असल्याने देशातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची प्रति क्विंटल ३५०० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.