13 September 18:02

सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात चांगल्या पावसाची शक्यता


सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात चांगल्या पावसाची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा देशभर सक्रिय होण्याची चिन्हे असून, पुढील पंधरवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. असे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) सांगितले आहे. तसेच हा पाऊस आतापर्यंत झालेल्या पावसातील तूट भरून काढेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

तर सध्या नैऋत्य मान्सून मध्य महाराष्ट्र व विदर्भात सक्रिय असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळ किनारपट्टीलगत चक्रवात स्थिती असून, दक्षिण मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत द्राेणीय कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात सध्या चांगला पाऊस होत आहे.टॅग्स