07 April 10:24

सदोष बियाण्यामुळे २ लाख रुपयांच्या कांद्याचे नुकसान


सदोष बियाण्यामुळे २ लाख रुपयांच्या कांद्याचे नुकसान

कृषिकिंग, सटाणा(नाशिक): सटाणा येथील शेतकरी जालिंदर देवरे यांच्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला सदोष बियाण्यामुळे टोंगळ आले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबधित बियाणे कंपनीने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी कैफियत पिडीत शेतकरी देवरे यांनी मालेगाव येथील उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार यांच्याकडे मांडली असून, आणि त्यांनी त्यांच्याकडे लेखी तक्रारही दिली आहे.

या तक्रारीत, “१५ सप्टेंबर २०१७ रोजी सटाणा येथील मे.यशवंतजी मोरे यांच्याकडून इंडो-अमेरिका (हा) सिड्स या कंपनीचे मार्शल कांदा बियाणे वाण खरेदी केले होते. त्यावेळी पाचशे ग्राम वजनाचे सात पाकिटे विकत घेतली होती. त्याची रोपे तयार करून ८ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या दीड एकर क्षेत्रावरील शेतात कांद्याची लागवड केली होती. सुमारे साठ हजार रुपयांचे कांदा पिक उभे केले, मात्र त्याला सदोष बियाण्यामुळे अक्षरशः टोंगळ फुटले. त्यामुळे कांदा पिकाची वाढ खुंटून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.” असे पिडीत शेतकरी देवरे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, कंपनीच्या प्रतिनिधींनी पिकाची पाहणी करून ८० टक्के कांदा पिकाचे नुकसान झाल्याची कबुली दिल्याचा दावा पिडीत शेतकरी देवरे यांनी केला आहे. मात्र कंपनीने फक्त बियाण्याचा खर्च देऊ, असे सांगून एक प्रकारे हात वर केल्याचे तक्रारीत देवरे यांनी नमूद केले आहे. असेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.टॅग्स