04 July 14:30

सदाभाऊ खोतांचा फैसला २१ जुलैला होणार


सदाभाऊ खोतांचा फैसला २१ जुलैला होणार

कृषिकिंग,पुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आज होणाऱ्या चौकशी समितीसमोर राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हजर राहणार नाहीत. त्यामुळे २१ जुलैला होणाऱ्या बैठकीत सदाभाऊंचा फैसला होणार आहे. सदाभाऊ खोतांना स्वाभिमानीतून काढून टाकण्याची दाट शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीने सदाभाऊ खोत यांना नोटीस पाठवून, पुण्यातील शासकीय विश्रामगृहात ४ जुलै रोजी हजर राहण्याची सूचना दिली होती.

स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सदाभाऊंविरोधात अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवली. त्यांचे वर्तन संघटनेच्या हिताला धोका पोहोचवणारे आहे, असा आक्षेप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.