16 January 15:03

सडत असलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात


सडत असलेल्या कांद्यामुळे शेतकरी संकटात

कृषिकिंग, अहमदनगर: गेल्यावर्षी नाशिक नगर या पट्ट्यात उन्हाळ कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. उत्पादन चांगले झाले, परंतू भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा तसाच चाळीत साठवून ठेवला. मात्र आता तो कांदा चाळीत व साठवलेल्या ठिकाणीच सडू लागला आहे. त्यामुळे ऐन दुष्काळात चांगले उत्पादन होऊनही, केवळ भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

उन्हाळ कांदयानंतर लाल कांद्याचेही चांगले उत्पादन झाले. लाल कांदा काढणी वेळी चांगला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा शेडमध्ये चाळीत साठवून ठेवला. सात ते आठ महिने टिकणारा कांदा वर्षभर भाव न मिळाल्याने चाळीमध्ये सडत पडला. तर आता लाल कांदा पुन्हा शेतामध्ये गाडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे चालू वर्षी दुष्काळी परिस्थितीमध्ये कांदा विकून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना हा कांदा उपयोगी आला असता, परंतू भावच नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतमालाबाबत शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्‍त केली आहे. शासनाने या सडलेल्या कांद्याचे पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.टॅग्स