07 July 08:00

संत्रावर्गीय पिकात वेळीच किडी व रोग नियंत्रणाचे उपाय करावेत


संत्रावर्गीय पिकात वेळीच किडी व रोग नियंत्रणाचे उपाय करावेत

मृगबहारातील फळे वाटाणे एवढी झालेली असल्यास राहलेली नत्र खताची अर्धी मात्रा त्वरित द्यावी. संत्रा,मोसंबी,लिंबू मृगबहारातील फळगळ दिसून येताच झाडावर एन.ए.ए. 10 पीपीएम + युरिया 1 टक्के + कार्बन्डेझीम 0.1 टक्के फवारणी करावी. बागेत पाणी साचू देऊ नये.संत्रा,लिंबू,मोसंबी झाडांना त्वरित बोर्डो मलम (1:1:10) लावावे. संत्रावरील काळी माशी,पांढरी माशी,सायट्रस सायला, कोळी,मावा इत्यादी करिता नियंत्रणाचे उपाय अंमलात आणावे.
डॉ. दिनेश ह. पैठणकर,डॉ. योगेश इंगळे, अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे, अकोला