04 November 14:50

शेतीसाठी आधुनिक यंत्राच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल!


शेतीसाठी आधुनिक यंत्राच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल!

कृषिकिंग, पुणे: भारत हा कृषीप्रधान देश असून, देशाची ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध प्रकारचे पीक घेतले जातात. यापूर्वी शेतकऱ्यांकडे सोबती म्हणून सतत बैलजोडी असायची. परंतु आधुनिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या आता कमी होऊन धानाच्या कापणी व मळणीकरिता यंत्रांच्या मागणीत आता वाढ झाली आहे.

पूर्वी शेतकऱ्यांना पेरणीपासून मळणीपर्यंत बैलजोडीची गरज मोठ्या प्रमाणात भासत होती. प्रत्येक शेतकऱ्याकडे गोधन मोठ्या प्रमाणात असायचे. घरोघरी दूध, दही व तूप भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असे. कुटुंबात शेतीसाठी बैल असायचे. पण आता देशी गायी पाळण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. गावरान गाईच्या तुलनेत अधिक दूध देणाऱ्या जर्सी होलस्टीन क्राईनखिस मुर्रा म्हैस अधिक नफा मिळविण्याच्या हेतूने शेतकरी पाळत आहेत.

याशिवाय अलीकडलच्या काळात खेड्यातील गोधन झपाट्याने कमी झाले तर म्हशींची संख्या रोडावली आहे. त्यामुळे शेतीसाठी उपयोगी बैलांची संख्या कमी झाली व यंत्रांची मागणी वाढली आहे.

ट्रॅक्टरने नांगरणी आणि वखरणी करून शेतात पेरणी केली जाते. सध्या शेतकरी मळणीसाठी बैलबंडी सोडून थ्रेसर ट्रॅक्टर मशिनचा उपयोग करीत आहेत. बैलांद्वारे धानाची मळणी केल्यास अधिक वेळ खर्च होतो. त्यातच मजुरांचा खर्चही अधिक. त्यामुळे आज शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळले आहेत. कमी वेळात लवकर धान्य तयार होत असल्याने डिझेल किंवा विजेवर चालणाऱ्या मळणी यंत्रांकडे, किंवा ट्रॅक्टरवरील यंत्राकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत आहे.टॅग्स