19 December 19:02

शेतकऱ्याने राज ठाकरेंना हात जोडून केली विनंती; वाचा काय आहे बातमी


शेतकऱ्याने राज ठाकरेंना हात जोडून केली विनंती; वाचा काय आहे बातमी

कृषिकिंग, नाशिक: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. तेव्हा एका शेतकऱ्यांनं कांदा उत्पादकांची व्यथा मांडली. मुंबईत तुम्हाला २० रुपये किलोनं कांदा मिळतो. पण इथं आम्ही २ रूपये, ३ रूपये किलोनं कांदा विकतो. व्यापारी कांदा घेतो आणि एक्सपोर्ट करतो. आमच्यावर खूप अन्याय होत आहे. अशी व्यथा या शेतकऱ्याने मांडली.

इतकंच नाही तर इथं कुणाच्या मुलीचं लग्न आहे, पोरांच्या शिक्षणाचा खर्च आहे. पण या मानसिकतेमुळे शेतकरी आत्महत्या करतोय, असं सांगताना शेतकऱ्याचा गळा दाटून आला होता. महाराष्ट्राला फक्त तु्म्हीच दिशा दाखवू शकता म्हणून तुमच्याकडे आलो आमचं निवदेन घ्या आणि न्याय द्या अशी विनंतीही या शेतकऱ्यानं राज ठाकरे यांना केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी या शेतकऱ्यांचं सविस्तर ऐकून निवदेन स्वीकारलं आहे.