05 March 08:30

शेतकऱ्यांसाठी स्वस्तात यंत्रे बनवणारा अवलिया


शेतकऱ्यांसाठी स्वस्तात यंत्रे बनवणारा अवलिया

कृषिकिंग, जळगाव: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पछवाडा गावात राहणाऱ्या राजेंद्र लोहार शेतकऱ्यांना उपयोगी पडतील अशी कृषी यंत्रे स्वस्तात तयार करतात. आणि विशेष म्हणजे राजेंद्र यांनी यासाठी कोणतीही मेकॅनिकलची डिग्री, शिक्षण किंवा कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. इतकंच नाही तर त्यांना शेतीचाही कोणताही अनुभव नाही. ज्यामुळे त्यांना हे मशीन्सची रूपरेषा तयार करण्यासाठी मदत होईल. परंतु ते हे काम अतिशय निपुणतेने आणि कौशल्याने करत आहेत.

आपले शिक्षण आर्थिक समस्येमुळे सोडावे लागल्यानंतर त्यांनी गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून १८ वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी जळगावमध्ये 'विश्वकर्मा वेल्डिंग वर्क्स' नावाचे स्वत:चे गॅरेज सुरू केले. त्यावेळी शेतकरीमित्र मोतिलाल पाटील त्यांना भेटले व शेतकऱ्यांना मदतकारक ठरतील, अशी स्वस्त यंत्रे तयार करण्याचा सल्ला त्यांनी राजेंद्र लोहार यांना दिला.

त्यानंतर राजेंद्र लोहार यांनी एक छोटा पॉवर ट्रॅक्टर तयार केला. स्कूटरचे इंजिन त्याला लावले व गॅरेजमध्ये असलेल्या भंगाराचा वापर करून त्यांनी हा ट्रॅक्टर बनवला. त्यानंतर मित्रांच्या मदतीने आणखी एक ट्रॅक्टर तयार केला. ६० टक्के नवा माल व ४० टक्के भंगार यातून ते ट्रॅक्टर तयार करू लागले. बाजारात २ लाख रुपयांपर्यंत मिळणारा ट्रॅक्टर लोहार केवळ १८ हजार रुपयांमध्ये बनवतात. शेतकऱ्यांच्या कामामधील नेमकेपण कळावे व त्यानुसार यंत्र तयार करावे यासाठी ते जळगाव सोडून आपल्या पछवाडा गावात परतले व तेथे त्यांनी त्यासाठी काम सुरू केले. शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी त्यानुसार यंत्रामध्ये, ट्रॅक्टरमध्ये बदल केले व ते चालूच असतात. आपल्याला यातून आनंद मिळतो, हाच मोठा आहे, असे ते मानतात. ट्रॅक्टरखेरीज आतापर्यंत त्यांनी पाच अशी यंत्रे तयार केली आहेत, ज्यांचा शेतकऱ्यांना मोठा उपयोग होतो. शेतकरीही त्यांना आर्थिक मदत देत असतात. याशिवाय त्यांनी विटा तयार करण्याचेही एक यंत्र तयार केले असून, त्यावर ६ लोक काम करून ८ तासांमध्ये २० हजार विटा बनवू शकतात.

“मेकॅनिक म्हणून काम करताना शेतकऱ्यांना उपयोगी पडतील. असे ट्रॅक्टर व यंत्रे तयार करून ती स्वस्तात देऊन आपल्याला त्यातून एक आनंद मिळतो, असे राजेंद्र लोहार सांगतात.