15 August 17:30

शेतकऱ्यांसाठी लवकरच कृषी निर्यात-व्यापार पॉलिसी आणणार- पंतप्रधान


शेतकऱ्यांसाठी लवकरच कृषी निर्यात-व्यापार पॉलिसी आणणार- पंतप्रधान

कृषिकिंग, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ७२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी लवकरच कृषी व्यापार पॉलिसी आणणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यावसाठी मदत होणार असून, देशातील शेतकरी जगभरातील व्यापारात थेट सहभागी होऊ शकणार आहे.

केंद्र सरकारने कृषी उत्पादन निर्यातीसाठी देशातील ५० जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादनासाठी क्लस्टर उभारले जाणार असून, या क्लस्टरमध्ये शेतीसोबतच उत्पादित वस्तूंच्या निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. म्हणजेच क्लस्टरच्या निर्मितीनंतर कृषी उत्पादनांची थेट निर्यात केली जाऊ शकणार आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही पॉलिसी लागू झाल्यानंतर २० कृषी उत्पादनांची क्लस्टर शेती केली जाऊ शकणार आहे. कृषी निर्यात व्यापारावर लक्ष ठेऊन या उत्पादनांची शेती केली जाणार आहे. यामध्ये द्राक्ष, अननस, केळी, सेब, लिची, संत्री, कांदा, बटाटा, चहा, टोमॅटो, कॉफी, मिरची, पुदिना,हळद, जिरे, मेथी, रबर याशिवाय समुद्री अन्नपदार्थांचा समावेश आहे.

हे क्लस्टर देशातील सर्व राज्यांमध्ये उभारले जाणार आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार कांद्यासाठी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात क्लस्टर उभारले जाणार आहे. मध्यप्रदेशातील इंदौर, सागर, दमोह आणि महाराष्ट्रातील नाशिक येथे कांद्यासाठी क्लस्टर उभारले जाणार आहे. तर बटाटा निर्यातीसाठी उत्तरप्रदेशातील आग्रा, फरिदाबाद, पंजाबमधील जालंदर, कपूरथला, होशियारपूर येथे क्लस्टर उभारले जाणार आहे. याशिवाय टोमॅटोच्या निर्यातीसाठी मध्यप्रदेशातील शहडोह, कर्नाटकातील कोलार, आंध्रप्रदेशातील कर्नुल, उत्तरांचलमधील रुद्रपूर येथे क्लस्टर उभारले जाणार आहे. कृषी निर्यात व्यापार विकसित करण्यासाठी खासगी कंपन्यांचीही मदत घेतली जाणार आहे. खासगी कंपन्या निर्यात सुविधा उपलब्ध उभारणीसाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात.