03 March 11:54

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: यावर्षीही सरासरी इतका पाऊस पडणार


शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: यावर्षीही सरासरी इतका पाऊस पडणार

कृषिकिंग, पुणे: राज्यातील आणि देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण यावर्षी राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने म्हणजेच आयएमडीने वर्तवला आहे. ला नीनाच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती सुधारल्याचेही हवामान खात्याने म्हटले आहे.

यावर्षी पाऊसमान चांगले राहण्याची शक्यता वाढली आहे. ला-नीनाची ही स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस जूनपर्यंत दाखल होईल आणि संपूर्ण पर्जन्यकाळात चांगला पाऊस होईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. ला-नीना कधी निर्माण होईल सध्या अस्पष्टता आहे. मात्र, त्याचा प्रभाव तसाच सूर राहिला तर तो भारतातील मान्सूनसाठी चांगला असेल, असे पुण्यातील इंडियन इन्स्टीट्युट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजीमधील (आयआयटीएम) वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. कृष्णन यांनी सांगितले आहे. याशिवाय, येत्या काही महिन्यात ला-नीना कमजोर झाला तरीही मान्सूनवरील प्रभाव सर्वसामान्य असेल. असेही ते म्हणाले.



टॅग्स