15 February 12:45

शेतकऱ्यांनो...बँका ऐकत नसतील तर मला सांगा, मी बघून घेतो- मुख्यमंत्री


शेतकऱ्यांनो...बँका ऐकत नसतील तर मला सांगा, मी बघून घेतो- मुख्यमंत्री

कृषिकिंग, बुलढाणा: "राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ करत असतील, तर पहिले शांततेत सांगून पाहा. नसतील ऐकत तर माझ्याकडे तक्रार द्या. मी बघून घेतो." असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीयीकृत बँकांना दिला आहे.

"आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मागील सरकारने पंधरा वर्षांत चारशे पन्नास कोटींची खरेदी केली. तर आम्ही साडेचार वर्षांत ८ हजार ५०० कोटींची तूर व हरभरा खरेदी केली आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे तूर व हरभऱ्याचे ऑनलाइन व ऑफलाइनचे सर्व पैसे देणार आहोत." अशी ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे.

माँ जिजाऊ साहेब सिंदखेडराजा विकास आराखड्यांतर्गत विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात काल (गुरुवारी) करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.