04 June 15:30

शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊन आंदोलन तीव्र करावे- पवार


शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊन आंदोलन तीव्र करावे- पवार

कृषिकिंग, मुंबई: सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळलेली नाही. सरकारची तशी नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घेऊन आंदोलन तीव्र करावे, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते मुंबईत बोलत होते. मी एक शेतकरी असे म्हणत शेतकरी संपाला आपला पाठींबा असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

मात्र, अन्नधान्य-भाजीपाला-कृषीमालाची नासाडी नको अशी विनंतीही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केली आहे. हे आंदोलन करताना शेतकऱ्यांनी सामान्य लोकांना त्रास होईल, त्यांच्यावर आघात होईल. तसेच रस्त्यावर दुध ओतणे टाळावे. आक्रोश दाखवायाचाच असेल तर शेतकऱ्यांनी एखाद्या मोहल्लात जाऊन दुध वाटप करून निषेध करावा. त्यामुळे कष्टाने पिकलेल्या मालाची नासाडी होणार नाही. आणि गरिबांची सहानुभूती मिळेल. असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे.टॅग्स