21 December 12:51

शेतकऱ्यांना मदतच न करणाऱ्यांना आमची मदत तोकडीच वाटणार- खोत


शेतकऱ्यांना मदतच न करणाऱ्यांना आमची मदत तोकडीच वाटणार- खोत

कृषिकिंग, सांगली: "कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे एवढे समजण्याजोगे हे शहाणे सरकार आहे. आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल याकडे जास्त लक्ष देतो. शेतकऱ्यांना मदतच न करणाऱ्यांना आमची मदत तोकडीच वाटणार," असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे.

कांद्याच्या दरावरून राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला कांदे फेकून मारा अशी टीका केली आहे तर दुसरीकडे राज्य सरकारनें कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तोकडी आहे. अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. या टीकेला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. याशिवाय गरज भासली तर आणखी मदत देण्याची तयारी राज्य सरकारची आहे. असेही ते म्हणाले आहे.