05 February 10:23

शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दीडपट भाव म्हणजे लबाडाघरचे आवतण- पवार


शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दीडपट भाव म्हणजे लबाडाघरचे आवतण- पवार

कृषिकिंग, औरंगाबाद: शेतकऱ्यांना उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची केंद्राची घोषणा हा खोटा डाव आहे. दीडपट हमीभाव दिला जाईल, असे एकीकडे सांगितले जात असले तरी दुसरीकडे उत्पन्न खर्च कमी दाखवण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे लबाडाच्या घरचे आवतण आहे. जोपर्यंत खिशात पडत नाही तोपर्यंत काहीही खरे नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १ डिसेंबरपासून राज्यात सुरू करण्यात आलेल्या सरकारविरुद्ध हल्लाबोल मोर्चाच्या समारोप प्रसंगी औरंगाबाद येथे जाहीर सभेत ते बोलत होते. २५ पिकांना हमीभाव देऊन ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले जाणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु ते शक्य होणार नाही. कारण आज कोणत्याही गावात खरेदी यंत्रणा नाही आणि खरेदी केलेले धान्य साठवण्यासाठीही यंत्रणा नाही. तर मग कशाच्या आधारावर सरकार असा दावा करत आहे, असेही पवार यावेळी म्हणाले आहे.