28 February 10:15

शेतकऱ्यांना आरक्षण दिल्यास आत्महत्या थांबण्यास मदत होईल- पवार


शेतकऱ्यांना आरक्षण दिल्यास आत्महत्या थांबण्यास मदत होईल- पवार

कृषिकिंग, मुंबई: सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास जातवर्गांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा जसा विचार समाजमान्य होतो आहे. त्यामध्ये शेतकरी या चौथ्या घटकाचा समावेश केला पाहिजे, असे काही जाणकार मंडळींनी सुचवले आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदत होईल. शेतकऱ्यांचे आरक्षण न्यायालयातही टिकेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशातील ८२ टक्के शेतकऱ्यांच्या जमिनीचे आकारमान २ हेक्टरच्या आत आहे. त्यातील ७० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे. परिणामी, मागच्या दशकभरात शेतकऱ्यांची विपन्नावस्था वाढली आहे. शेती मोठी जोखमीची झाली आहे. शेतकरी घटकाला आरक्षण दिल्यास अनेक जात घटकांना त्याचा लाभ होईल. हे आरक्षण केवळ मराठा जातीपुरते नसेल. मुळात ते जातीच्या आधारावर असणार नाही. या आरक्षणामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.