04 May 10:55

शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर न देणारे संघ बरखास्त करणार: मुख्यमंत्री


शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर न देणारे संघ बरखास्त करणार: मुख्यमंत्री

कृषिकिंग, मुंबई: राज्य सरकारने दुधासाठी निश्चित केलेला २७ रुपये प्रतिलिटर दर देण्याबाबतच्या नोटिसा सर्व दूध संघांना जारी केल्या आहेत. सरकारी दर न देणाऱ्या या दूध संघांवर सात दिवसांत बरखास्तीची कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसेच दुधाला हमीभाव देण्यासाठी कायदा करु, असे दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर म्हणाले आहेत.

दरम्यान, दुधाला याेग्य दर मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघर्ष समितीकडून आंदोलन सुरु अाहे. ‘लुटता कशाला, फुकटच न्या’ असा नारा देत दूध उत्पादकांनी काल (गुरुवारी) औरंगाबाद आणि परभणी, सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, सोलापूर या जिल्ह्यांत माेफत दूध वाटप करत सरकारचा निषेध केला. तसेच या ७ दिवसांनतरही आश्वासनाची अंमलबजावणी न केल्यास ठिकठिकाणी घेराव, मोर्चे, रास्तारोको आणि धरणे धरून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी संघर्ष समितीने यावेळी दिला आहे.