11 December 14:58

शेतकरी साठेंची मनीऑर्डर पंतप्रधान कार्यालयाने परत पाठवली


शेतकरी साठेंची मनीऑर्डर पंतप्रधान कार्यालयाने परत पाठवली

कृषिकिंग, नाशिक: कांद्याला कमी भाव मिळत असल्याने नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी पंतप्रधान मोदींना मनीऑर्डर पाठवली होती. नैताळे येथील पोस्ट कार्यालयातुन साठे यांनी ही मनीऑर्डर पाठवली होती. मात्र आता पीएमओकडून ही मनीऑर्डर परंत पाठवण्यात आली असून, पोस्ट कार्यालयाने संजय साठे यांना बोलावून त्यांच्याकडे १०६४ रुपयांची रक्कम सुपूर्द केली आहे.

शेतकरी साठे यांच्या कांद्याला लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारातील लिलावात अत्यंत कवडीमोल भाव मिळाला होता. त्यामुळे नैताळे संजय साठे यांनी विक्रीतून आलेली १०६४ रुपयांची रक्कम मनीऑर्डरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून कांदा उत्पादकांच्या व्यथा समोर आणल्या होत्या.

मात्र, संजय साठे हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का?, याबाबत चौकशी सुरू झाली होती. अधिकाऱ्यांनी परिसरात आणि मित्रपरिवाराकडे याबाबत चौकशी केली होती. तर आता मनीऑर्डर कुठल्याही आश्वासनाशिवाय परत आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.