21 December 18:31

शेतकरी विरोधी सरकारच्या लढ्यासाठी व्रज्रमुठ बांधा- योगेंद्र यादव


शेतकरी विरोधी सरकारच्या लढ्यासाठी व्रज्रमुठ बांधा- योगेंद्र यादव

कृषिकिंग, पिंपळगांव बसवंत(नाशिक): "शेतकरी विरोधी धोरण असलेल्या भाजप सरकारच्या सत्तेला हादरा देण्यासाठी आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांनी व्रज्रमुठ बांधा." असा एल्गार अखिल भारतीय किसान संघर्ष संमन्वय समितीचे अध्यक्ष योगेद्र यादव यांनी पुकारला आहे.

कांद्याच्या कोसळलेल्या दरासंदर्भात पिंपळगांव बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी पिंपळगांव बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर,स्वराज इंडियाचे आवेश शाह, सुभाष लोमटे अँड.सविता शिंदे हे प्रमुख उपस्थित होते.

कॉग्रेसच्या सत्तेच्या काळात रूग्णालयात दाखल झालेला शेतकऱ्यांना मोदी सरकारने आयसीयु मध्ये आणून ठेवले आहे. पाच राज्यातील निवडणुकीत शेतकऱ्यांनी झटका दिल्यानंतर सत्तेत मदहोश असलेल्या केद्रातील सत्ताधाऱ्यांची झांज उडविली. असेही ते म्हणाले आहे. याशिवाय कांद्याला २०० रूपये तुटपुंजे अनुदान जाहीर करण्यात आले, मात्र, ही तर शेतकऱ्यांची थट्टा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.