30 November 17:39

शेतकरी मोर्चा: शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांनी दिला पाठिंबा


शेतकरी मोर्चा: शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांनी दिला पाठिंबा

कृषिकिंग, नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले असून, त्यांनी मोर्चाला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दोन्ही विधेयके संसदेत मांडून कायदा करण्यात येईल. त्यासाठी संसदेत आवश्यक संख्याबळ आमच्याकडे नसलं तरी खासगी विधेयक सादर करून, कायदा करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, असे सांगत शरद पवारांनी आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.

याशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय(एम) चे सीताराम येचुरी, कन्हैया कुमार, शरद यादव, फारुख अब्दुल्ला यांसारख्या बड्या नेत्यांनीही मोर्चाला उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आहे.

राहुल गांधी यांनी यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तर अरविंद केजरीवाल यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. अशी मागणी केली आहे.