10 October 09:44

शेतकरी देशोधडीला लागलेत अन यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडतायेत!- पवार


शेतकरी देशोधडीला लागलेत अन यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पडतायेत!- पवार

कृषिकिंग, औरंगाबाद: शेतकऱ्यांना तूर, हरभऱ्याचे पैसे मिळत नाही आणि फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची स्वप्न काय बघता? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. दुष्काळाच्या मुद्यावरुन सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना त्यांनी ही टीका केली आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसची संविधान बचाव रॅली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

केंद्र व राज्य सरकारचा नाकर्तेपणा दिसून येत आहे. हे सरकार श्रीमंतांचे सरकार आहे. गोरगोरिबांना वाऱ्यावर सोडण्यात येत आहे. चोक्सी, नीरव मोदी हे कित्येक कोटी घेऊन परदेशात गेले. हे अर्थमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिसत नाही. नोटबंदीमुळे देशोधडीला लागलो. पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. मात्र, यांना शेतकरी आणि गरीबांचे देणेघेणे नाही, अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे. देशातील हे श्रीमंताचे सरकार उलथवून टाकले पाहिजे. त्याशिवाय या देशात चांगले दिवस येणार नाही, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला आहे.