12 April 15:46

शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा! सदाभाऊ खोतांची राजू शेट्टींवर जहरी टीका


शेट्टी म्हणजे उसाला लागलेला कोल्हा! सदाभाऊ खोतांची राजू शेट्टींवर जहरी टीका

कृषिकिंग, सांगली: ''राजू शेट्टी उसाचं आणि दूधाचं आंदोलन करत आहे. पण हा शेट्टी उसाला लागलेला कोल्हा आहे. हा कोल्हा उसाचे राजकारण करून कारखानदारांच्या मांडीला मांडीला लावून बसला असून, तो फडात बसून शेतकऱ्यांचीच शिकार करत आहे'', अशी जहरी टीका मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारसभेत इस्लामपूरात ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम हेही उपस्थित होते.