10 June 11:05

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना संपातून बाहेर


शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना संपातून बाहेर

कृषिकिंग. नाशिक: राज्यात शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरू असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या संपाचे नेतृत्व करणाऱ्या सुकाणू समितीतून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना या आंदोललनातून बाहेर पडण्याच्या विचारात आहे.

सुकाणू समितीने आमच्या मागण्या आणि भूमिकेचा विचार केल्यास १४ जूनला संपातून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट आणि सदस्य रामचंद्रबापू पाटील यांनी सांगितले. नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय घेण्याऐवजी उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या मंत्रिगटासमवेत संपकऱ्यांची सुकाणू समिती रविवारी दुपारी चर्चा करणार आहे. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे.

शेतकऱ्यांचा संप ज्या विचारधारेतून पुढे आला आहे त्या मागण्या शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना यांच्या मागण्यांशी विसंगत आहेत. त्यामुळे सुकाणू समितीतून या संघटनेने बाहेर पडणे अधिक संयुक्तिक ठरणारे आहे.