02 November 07:00

व्हर्टिसिलिअम लेकॅनी वापरण्याचे फायदे


व्हर्टिसिलिअम लेकॅनी वापरण्याचे फायदे

स्त्रोत: कृषिकिंग ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७ व्हर्टिसिलिअम लेकॅनी वापरण्याचे फायदे याविषयी थोडक्यात माहिती.

जैविक कीडनाशक वापरण्याचे फायदे
व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक कीड नाशकाच्या वापरामुळे कीटकांमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होत नाही त्यासोबत पिकांमध्ये कीडनाशकांचा अंश देखील राहत नाही. हे जैविक कीडनाशक मित्रकिडींना पूर्णपणे सुरक्षित आहे त्यामुळे त्याचा वापर एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये खूप चांगल्या प्रकारे करता येतो .

विशेष काळजी
व्हर्टिसिलिअम लेकॅनी वापर करण्यापूर्वी व केल्यानंतर १५ दिवसांपर्यंत रासायनिक बुरशीनाशकांचा वापर थांबवावा, त्यामुळे व्हर्टिसिलिअमचा परिणाम चांगला मिळतो.

सुसंगतपणा
व्हर्टिसिलियम लेकॅनी हे नीम तेल किंवा इतर जैविक कीडनाशकासोबत सुसंगत आहे. या जैविक कीडनाशकांचा वापर करताना यासोबत कोणत्याही प्रकारचे बुरशीनाशक मिक्स करू नये.
डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले