15 September 16:57

व्यापाऱ्यांवरील छापेमारीनंतर कांद्याच्या दरात ३५ टक्क्यांनी घसरण


व्यापाऱ्यांवरील छापेमारीनंतर कांद्याच्या दरात ३५ टक्क्यांनी घसरण

कृषिकिंग, नाशिक: नाशिक मधील कांदा व्यापाऱ्यांच्या घरांवर तसेच गोदामांवर आयकर विभागाने काल धाड टाकताच आज कांद्याचे दर तब्बल ३५ टक्क्यांनी घसरले आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारात काल काद्यांचा भाव प्रतिक्विंटल १४०० रुपये होता तो आज ९०० रुपयांवर घसरला आहे.

जिल्ह्यातील पिंपळगाव, लासलगाव, सटाणा, कळवण, उमराणा, येवला, चांदवड येथील सात कांदा व्यापाऱ्यांच्या घरांवर आयकर विभागाने छापे मारले होते. त्यांची घरे, कार्यालये आणि गोदामांची तपासणीही करण्यात आली. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापार बाजारात एकच खळबळ उडाली असून, त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरले, अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सूत्रांनी दिली आहे. घाऊक बाजारातील कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी कमी किंमतीत त्यांच्याकडचा माल विकायला नकार असून, त्यामुळे सध्यस्थितीत कांद्याचा लिलाव बंद पडला आहे.टॅग्स