30 January 12:14

विदर्भात थंडीची लाट; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता


विदर्भात थंडीची लाट; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

कृषिकिंग, मुंबई: राज्यातील किमान तापमानात उल्लेखनीय घट नोंदविण्यात येत असतानाच दुसरीकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र वर्तवला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. असेही आयएमडीने म्हटले आहे.

याशिवाय ३० जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल तर काही ठिकाणी दिवसाही गारवा राहील. ३१ जानेवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १ फेब्रुवारी रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २ फेब्रुवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. असेही आयएमडीने म्हटले आहे.