25 January 10:24

विदर्भात गारांसह मुसळधार पाऊस; पिकांचे मोठे नुकसान


विदर्भात गारांसह मुसळधार पाऊस; पिकांचे मोठे नुकसान

कृषिकिंग, नागपूर: विदर्भाला सर्वदूर अवकाळी पावसाने झोडपले आहे. आज (शुक्रवारी) मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी पिकांसह भाजीपाल्यालाही याचा फटका बसला आहे. भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारा पडल्याने पीक भुईसपाट झाले आहे. तर गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

विदर्भातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनांसह कोसळलेल्या या पावसासोबतच गाराही पडल्या आहेत. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर अधिक होता. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारा पडल्याचे वृत्त आहे. कापून ठेवलेल्या तुरीच्या गंजी पावसात भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच धान, कापूस सोयाबीन व चणा या पिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.