03 October 16:54

विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज


विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज

कृषिकिंग, मुंबई: “राज्यात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात ५ ते १४ ऑक्टोबर या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता काही हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे याकाळात शेतकरी बांधवांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा,” असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.

“या अतिवृष्टीमुळे खरीपाच्या उत्पादनास नुकसान होऊ शकते. सध्या कापणीयोग्य असलेल्या शेतमालास त्यामुळे फटका बसु शकतो. शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान टाळावे, यासाठी त्यांनी हा शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसेच जेथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. अतिवृष्टीमुळे शेती मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे,” असेही फुंडकर यांनी सांगितले आहे.



टॅग्स