07 December 11:00

वासराला जन्मल्यानंतर कशा पद्धतीने आहार दयावा?


वासराला जन्मल्यानंतर कशा पद्धतीने आहार दयावा?

स्त्रोत: कृषिकिंग डिसेंबर २०१७ जानेवारी २०१८
वासराचा जन्म झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात १ ते दीड लीटर चीक त्याच्या पोटात जाणे आवश्यक आहे. त्यानंतर ३/३ तासांनी दोन वेळा प्रत्येक वेळी १ ते दीड लीटर. त्यानंतर दूध काढण्याच्या वेळी दर १२/१२ तासांनी त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून वासरासमोर मोजून दीड ते १ लीटर पिण्याचे पाणी ठेवण्यास सुरुवात करावी. आठव्या दिवसापासून स्पेशल तयार केलेले वासराचे खाद्य (ज्यात प्रथिने आहेत २८ ते ३० टक्के) तर चरबी आहे ८ ते १० टक्के १००/१०० ग्रॅम (२ मुठी भरून) एका भांड्यात ठेवावे त्यांत थोडसे दूध घालावे. म्हणजे त्या वासाच्या व चवीच्या निमित्ताने ते थोडेसे चाटायला लागेल. नंतर ८/१० दिवसांनी म्हणजेच जन्मल्यापासून १५ ते २० दिवस कोरड्या चाऱ्याची किंवा वाळलेल्या चाऱ्याची पशाने ठेवावीत. १ महिन्यानंतर १ ते दीड लिटर दूध कमी करून वासराचे पशुखाद्य घालावे. १ ते दीड महिन्यांतर हिरवा चारा (एकदल व द्विदल प्रकारचा) सुरू करावा. असे करत करत ३ महिन्यांनी सर्व दूध बंद करून वासराला चारा / पशुखाद्य देण्यास सुरुवात करावी. ह्यात भाजलेल्या सोयाबीनचा भरडा ५० ते १०० ग्रॅम द्यावा.
लेखक- डॉ. वासुदेव सिधये मो. ९३७०१४५७६०